Saturday, February 16, 2019

World news

World news

View More
 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर


नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. नरेंद्र मोदींच्या हस्ते आज विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहेत. शिवाय ते दोन जाहीर सभांनादेखील संबोधित करणार आहेत.

नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता नागपूरला पोहोचतील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडाला रवाना होतील. पांढरकवडा येथील कार्यक्रम पार पडल्यानंतर मोदी जळगावला रवाना होणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असणार आहेत.

दिवसभरातील कार्यक्रम

  • नांदेडमधील एकलव्य आदर्श विद्यालयाचं उद्घाटन

  • नागपूर-पुणे ट्रेनला व्हिडीओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवतील.

  • महिला स्वयंसहायता समूहातील सदस्यांना प्रमाणपत्र व धनादेश वाटप. यातील सुमारे 25 महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधणार. यानंतर त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे.

  • धुळे येथे लोअर पंजारा मध्यम प्रकल्पाचे लोकार्पण व सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना आणि अमृत योजनेचे भूमिपूजन.

  • धुळे-मनमाड रेल्वे मार्ग आणि जळगाव-मनमाड या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन.

  • भुसावळ-वांद्रे एक्सप्रेस ट्रेनला व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवतील.

  •  जळगाव-उधना दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे उद्घाटन.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

शहीदांच्या कुटुंबांना 50 लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

शहीदांच्या कुटुंबांना 50 लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा



 Last Updated: 15 Feb 2019 08:00 PM
मुंबई : जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या दोन्ही कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारीही राज्य शासनातर्फे उचलण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तासगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ पूर्णाकृती शिल्प व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती शिल्प यांचे अनावरण व लोकार्पण सोहळा आणि सामाजिक अधिकारिता शिबिरांतर्गत दिव्यांगांना सहाय्यक उपकरण वाटप कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण देश आज उद्विग्न असून सर्वांच्या मनात प्रचंड राग आहे. पाकिस्तान आगळीक करत असून त्यांना त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक आहे. अशा घटनांना जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली.

या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. बुलडाणा जिल्ह्यातील संजय राजपूत आणि नितीन राठोड हे दोन जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत संपूर्ण देश असून त्यांच्या कुटुंबांचे संपूर्ण पुनर्वसन शासनामार्फत केले जाईल. तसेच त्यांना 50 लाखांची मदत दिली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
PROMO | घे भरारीमध्ये आजच्या भागात काय पाहाल?

PROMO | घे भरारीमध्ये आजच्या भागात काय पाहाल?

PROMO | घे भरारीमध्ये आजच्या भागात काय पाहाल? | 

14 Feb 2019 11:54 AM
Updated 14 Feb 2019 11:54 AM

घे भरारीमध्ये आजच्या भागात काय पाहाल? | एबीपी माझा